रेल कामगार सेनेचा 22 वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा.


भुसावळ –
येथिल रेल कामगार सेनेचा 22 वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. पर्यावरणच महत्व ओळखून व वर्धापन दिनाचे औचित्य साधुन वड,पिम्पळ,लिंब असे 11 वृक्ष लावण्यात आली असून वृक्ष संगोपनाची जबाबदारी रेल कामगार सेनेने घेतली आहे. यावेळी केंद्रीय अध्यक्ष शिवसेना नेते माजी खासदार आनंदराव अडसुळ, दिवाकर देव,सजंय जोशी, नरेंद्र शिंदे,स्वप्निल झेमसे यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले व येणाऱ्या मान्यताप्राप्त निवडणुकीत रेल कामगार सेनेला जास्तीत जास्त विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले.सद्या प्रशासना तर्फे फार मोठ्या प्रमाणात कामगारांवर अन्याय-अत्याचार होत आहे व बहुसंख्य कामगारांना रेल कामगार सेनेतर्फे त्यांचे कामे मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले.
यावेळी रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा,योगेश माळी,प्रदीप भुसारे,एम के शहा,प्रकाश करसाळे,अरविंद थोरात,शेख शकील तम्मा पहेलवान, अब्दुल अजीज,पंकज ठाकरे,मंगेश शेलोडे,रणजीत चौधरी,अर्जुन व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *