रेल्वेने मुंबई आणि वाराणसी दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील पुढे दिलेल्या माहितीनुसार:

04239 विशेष दि. १२.६.२०२१, १४.६.२०२१,
१६.६.२०२१ व १८.६.२०२१ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून दुपारी २३.५० वाजता सुटेल व वाराणसी येथे तिसर्या दिवशी ०५.०० वाजता पोहोचेल.
04240 विशेष दि. ११.६.२०२१, १३.६.२०२१,
१५.६.२०२१ व १७.६.२०२१ रोजी वाराणसी येथून १९.१५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथे दुसर्या दिवशी २२.१० वाजता पोहोचेल.
थांबे :कल्याण, नाशिकरोड,भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना आणि प्रयागराज छिवकी.
संरचना : २ तृतीय वातानुकूलित, १२ शयनयान आणि ८ द्वितीय आसन श्रेणी.
आरक्षण : 04239 या विशेष ट्रेनचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. १२.६.२०२१ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर प्रारंभ झाले आहे
तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.
— — –


