भूसावळ –

दिनांक 26.05.2021 रोजी चांदनी रेल्वे स्टेशन इमारतीचा कैंटिलीवर व्हरांडा समोरच्या भिंतीवर पडला आणि स्टेशनच्या इमारतीला नुकसान झाले. त्याच दिवशी, इमारतीच्या संरचनेला भार सहन करण्यासाठी तात्काळ तात्पुरती व्यवस्था प्रदान करण्यात आली आणि ट्रेनचे कामकाज सुरळीत होते. आणि त्यामुळे कामावर व्यत्य आला नाही.
यानंतर इमारतचे पुन:बांधकाम काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. ट्रेनच्या कामकाजाची संवेदनशीलता लक्षात घेता हे काम चालविण्यात आले. छताला आधार देण्यासाठी योग्य ठिकाणी स्टील प्रॉप्स बसविण्यात आले. रिले रूम आणि पॅनेल रूमच्या संवेदनशील इलेक्ट्रॉनिक उपकरण प्रभावित होणार नाही याची काळजी घेण्यात आली .
साधारणपणे १० दिवसाच्या विक्रमी कालावधीत
20.2 x 1.8 मीटर आकाराच्या मोकळ्या व्हरांड्यासह समोरील भिंतीची पुनर्रचना, प्लास्टर आणि रंगकाम काम
पूर्ण करण्यात आले.
कोविड १९ साठी अनिवार्य सर्व प्रोटोकॉलसह इमारत पूर्ववत करण्याचे संपूर्ण काम 10 जून, 2021 रोजी पूर्ण झाले.असल्याचे रेल्वे विभागाने प्रसिद्धि पत्रकान्वये कळविले आहे .


