भुसावळ पर्यावरण सखीमंचतर्फे पर्यावरण दिन साजरा ; सखी मंचचा एकच नारा ; संपूर्ण परिसर करू हरीतमय सारा ;


भुसावळ (प्रतिनिधी ) –
पर्यावरण दिनानिमित्त शहरात पर्यावरण सखी मंच मंडळाचा पहिला पर्यावरण दिन खूप धूमधडाक्यात साजरा झाला.

कार्यक्रमाला उपस्थित नाना पाटील सर व जेष्ठ तज्ञ मार्गदर्शक अप्पासाहेब सोनवणे यांनी मार्गदर्शन करून झाडे का लावावीत आणि कशी जगवावीत याचे अमुल्य मार्गदर्शन केले. आपल्या जळगाव जिल्हाध्यक्ष मनिषा ताई पाटील आणि शहर अध्यक्षा नेहा ताई जगताप या दोघींनी टू व्हीलर वरती जळगाव ते भुसावळ प्रवास करून कार्यक्रमाला हजेरी लावली आणि सर्व सख्यांचा उत्साह वाढवला.
सर्व सख्यांनी आपल्या आपल्या घरून रोपे तयार करून आणली, आंब्याच्या कोई तसेच चिंचोके सुद्धा आणले. रोपांमध्ये वड, पिंपळ, जांभूळ, आवळा, नारळ कढीपत्ता, बदाम अशा मोठमोठ्या झाडांचा तसेच तुळशी सदाफुली, कोरफड अशा छोट्या रोपांचा सुद्धा समावेश होता. आमच्या सख्या सीमा डोलारे व कार्याध्यक्ष आरती चौधरी यांचे पर्यावरण पूरक काम पाहता त्यांचा अध्यक्षा सौ. शालीनी वाडकर यांनी गुलाबाचे रोपटे देऊन स्वागत केले. मंडळाचे सखी विद्याताई पाटील आणि मधुकर दादा पाटील या जोडप्याने त्यांच्या शेतात वृक्षारोपणासाठी जागा तसेच गड्डे सुद्धा खोदून दिले. प्रतीक दादाने आणि उत्कर्ष ने धावपळ करत खूप मोलाचे सहकार्य केले. भुसावळ टीमने असा संकल्प केला आहे की दर आठ पंधरा दिवसाला जिथे शक्य आहे तिथे वृक्षारोपण करून, वृक्ष वाढवून भुसावळ हरित मय करू. मनिषा ताई पाटील, महानंदा ताई अलका भटकर ताई यांनी सुद्धा आपले मनोगत मांडले. मधुकर दादा पाटील यांनी सर्व सख्यांना नाश्ता आणि चहाची व्यवस्था केली. यावेळी सौ. आरती ताईं चौधरी यांनी सर्व सख्यांना गांडूळ खताची पिशवी भेट म्हणून दिली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. शालिनी वाडकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *