वरणगाव –
येथील नागेश्वर मंदिर ते वेल्हाळा रोडाचे काम काही दिवसांपासून सुरू झाले आहे परंतु ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून शिवसैनिकांच्या लक्षात येताच काही शिवसैनिक व पदाधिकारी यांनी जागेवर पाहणी केली असता तिथे जाड खडी ऐवजी माती मिक्स मुरूम वापरत होते त्या मुरूमची रॉयल्टी भरली नसून बिना परवाना मुरूमाचे उत्खनन केले जात आहे .
, तसेच एकाच ठिकाणी रॉयल्टी काढून दोन ऐवजी जास्त वाहनांचा वापर करून पोकलँड च्या सहाय्याने मोठ्याप्रमाणावर उत्खनन करून हा कच्चा मुरूम इतरत्र कामावर देखील वाहून नेला जात आहे भरपूर मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन होत असून या सर्व उत्खननात संबंधित ठेकेदार जबाबदार आहे यामुळे शासकीय महसूल बुळत असून शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे .
याबाबतचे निवेदन तहसीलदार भुसावळ यांना देण्यात आले असून रस्त्याचे निकृष्ट होत असलेले कामाबाबत निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहे . तसेच हे काम उत्कृष्ट दर्जाचे न केल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसेनेचे अल्पसंख्याक जिल्हा उपसंघटक शेख सईद शे भिकारी यांनी दिला आहे .
याबाबत संबंधित दोन्ही विभागाने तात्काळ दखल घेऊन संबंधित ठेकेदारावर रस्त्याचे काम निकृष्ट केल्याची जबाबदारी निश्चित करत कोणतीही बिले अदा करू नये व नियमानुसार योग्य ती कारवाई करावी तसेच भरपूर मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन केले असल्याने महसूल विभागामार्फत तात्काळ मोठ्या स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे



