भुसावळ (प्रतिनिधी )-

शहरातील मुनिसिपल पार्क भागात गेल्या एक वर्षापासून गटारी वरील ढापा तुटला असल्याने वाहन धारकांसह पादचाऱ्यांना सुद्धा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार पालिकेत तक्रारी करून सुद्धा पालिका प्रशासनाचा निष्क्रियतेमुळे आजपर्यत ढापा नव्याने होऊ शकला नाही. विशेष म्हणजे याच परिसरात नगराध्यक्ष यांचे वास्तव्य आहे, असे असतांना सुद्धा ढापा दुरुस्तीला अथवा नवीन करण्यास मुहूर्त लागत नसल्याने या परिसरातील रहिवाशांना मधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पालिकेचे मुख्याधिकारी यांनी या परिसरात पाहणी करून नागरिकांची होत असलेली गैरसोय दूर करावी अशी मागणी केली जात आहे.


