भुसावळ (प्रतिनिधी )-
महाराष्ट्र सरकारने जाहिर केलेल्या योजने अंतर्गत परवानाधारक रिक्षाचालकांसाठी १५०० रुपये आर्थिक सहाय्य मिळण्याकरीता ऑनलाइन रजिस्ट्रेशन नोंदणी करण्याकरीता येथील शिवसेनेचे शहर संघटक योगेश बागुल यांनी पुढाकार घेतला असून भुसावळात शिवसेनेतर्फे रिक्षाचालकांसाठी मदत कक्ष उभारण्यात येत आहे . या मदत कक्षाचे उद्द्घाटन शहरातील यावल नाका गांधी पुतळयाजवळ २७ मे रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आले आहे .
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील, उपजिल्हा प्रमुख श्याम श्रीगोंदेकर ,तालुका प्रमुख समाधान महाजन , तालुका संघटक धीरज पाटील, उत्तर विभाग शहर प्रमुख नीलेश महाजन , दक्षिण विभाग शहर प्रमुख बबलु ब-हाटे व महिला तालुका संघटक भुराबाई चव्हाण ,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे असे शिवसैनिक भुसावळ शहर संघटक
योगेश बागुल भुसावळ शहर संघटक यांनी कळविले आहे .
तसेच सर्व रीक्षा चालक बांधव यांनी आधारकार्ड(बँक खाते लिंक केलेले ) , बँक खाते क्रमांक , परवाना /बँच , रिक्षा परवाना , रिक्षा नबंर या कागदोपत्राची झेरॉक्ससह उपस्थित राहावे असेही आवाहन आयोजकानि केले आहे .



