वरणगाव –
बहोत हुई महेंगाई की मार.हटाओ मोदी सरकार., च्या घोषणा देत कोरोना पार्श्वभूमिवर शासकीय नियमांचे पालंन करुंन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात वाहनधारकाना गुलाबाचे फुल देऊन गांधीगरी पद्धतीने पेट्रोल दरवाढ विरोधात आणि रासायनिक खते दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले याबाबत प्रांताधिकारी व तहसिलदार भुसावळ यांना आज सोमवार रोजी निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, तालुका अध्यक्ष दिपक मराठे युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय आर पाटिल सर,माजी नगरसेवक सुधाकर दादा जावळे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष पप्पू भाई जकातदार,ओबीसी सेल तालुका अध्यक्ष मनोज कोलते सर,शहराध्यक्ष समाधान भाऊ चौधरी,युवक शहराध्यक्ष सोहेल कुरेशी,शहर उपाध्यक्ष कैलास भाऊ माळी, माजी नगरसेवक विष्णु खोले, नगरसेवक रवींद्र सोनवणे, माजी नगरसेवक गणेश चौधरी, तालुका सरचिटणीस राजेश चौधरी,इफतेखार भाई मिर्झा,महेश सोनवणे, युवक कार्याध्यक्ष विनायक शिवरामे,राजेश इंगळे सर, शेख एहसान शरदराव देशमुख, शेख रिजवान, ओबीसी सेल वरणगाव शहराध्यक्ष .हिमालय भंगाळे , रवी पाटील आकाश दिलीप झोपे यांचेसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अनेक नेते ,पदाधिकारी आणि राष्ट्रवादी प्रेमी नागरिक उपस्थित होते.



