सहस्त्रलिंग नजिक पोलिसांवर फायर करून पसार दोघे गारखेड़ा येथे पोलिसांच्या ताब्यात ;


रावेर –
तालुक्यातील आदिवासी भागात सहस्त्रलिंग नजिक रात्री तीनच्या सुमारास अज्ञात चार संशयीतांनी पोलिसांवर फायर करून पोबारा केल्याची घटना घडली होती.
या प्रकरणी गारखेड्यातुन दोन जणांना सह.पोलिस निरिक्षक तथा तपास अधिकारी शितलकुमार नाईक यांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
दि ११ च्या रात्री पेट्रोलिंग करून पोलिस कॅमेरा व्हॅन नं एमएच १९ एम ०६८१ या गाडीने रावेरच्या दिशेने येत असतांना रावेर कडून पाल कडे जाणा-या दोन मोटरसायकल दिसल्या त्यातील एका मोटरसायकला पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता.त्यांनी पोलिसांच्या दिशेने फायर केला होता.या प्रकरणी रावेरात गुन्हा दाखल करण्यात आला . त्यानुसार गुन्हा तपासासाठी डिवायएसपी नरेंद्र पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली चार पथके तयार करण्यात आली होती . तपास अधिकारी शितलकुमार नाईक ,पोलिस कर्मचारी राजेंद्र राठोड,संदीप धनगर,अतुल तडवी,नरेंद्र बाविस्कर त्यांच्या सहकारी पथकाने गुप्त बातमीदाराकडून माहिती काढली व जंगलात अवैद्य शिकार करणारे लोकांची माहिती काढली असता व गारबर्डी गावातील पाच जणांनी गुन्हा केल्याचे समजले त्यापैकी रमेश जगन बारेला, वय 30 रा.गारबर्डी ता. रावेर दिनेश जबरसिंग बारेला वय 24 वर्षे रा.गारबर्डी ता रावेर असे यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हाची कबुली दिली असून त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे
असे फिरले तपासाचे चक्र
दिनांक ११ रोजी शिकारसाठी वापरणा-या बंदूकीने पोलिसांवर फायर,त्यानंतर या प्रकरणी रावेरात गुन्हा दाखल झाला
व वरिष्ठ पोलिस अधिकारीचंद्रकांत गवळी डिवायएसपी नरेंद्र पिंगळें, यांनी घटनास्थळी भेट दिली या गुन्हाच्या तपासाची चक्र एपीआय नाईक यांनी घेतले स्वता कडे,दि १२ आदिवासी भागात शिकार व बंदूक वापरणा-यां बद्दलची माहिती घेतली . त्यानुसारआज गुरुवार रोजी या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *