भुसावळात महाराणा प्रताप जयंतीनिमित्त आ.संजय सावकारे यांच्या हस्ते रूग्णवाहिकेचे लोकार्पण संपन्न ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाचे पार्श्वभूमिवर रुग्नांची काळजी अत्यावश्यक असल्याची जाणीव त्याच बरोबर समाजाचे काहीतरी देंण लागतो ही बाब राजपूत समाजाचे एकमेव नगरसेवक महेंद्र सिंग उर्फ पिंटू ठाकूर यांच्या निदर्शनास आली व त्यांनी त्वरीत आज रविवार ९ मे रोजी महाराणा प्रताप यांच्या ४८० व्या जयंती निमित्त या स्तुत्य संकल्पनेस आकार दिला . शहरात रुग्णाच्या सेवेकरीता रुग्णवाहिका सप्रेम भेट देवून आज या मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार संजय सावकारे यांचे हस्ते करण्यात आले .
प्रारंभी क्रांतिसूर्य महाराणा प्रतापसिंह यांचे प्रतिमेस आमदार सावकारे यांचे हस्ते माल्यार्पण करण्यात येवून अभिवादन करण्यात आले . तदनंतर भुसावळ शहरातील नागरिकांसाठी दिलेल्या मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले .
प्रसंगी प्रमुख म्हणून मुख्याधिकारी संदिप चिद्रवार , नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक युवराज लोणारी,नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर,नगरसेवक परीक्षित बऱ्हाटे,जेष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण तसेच समाज बांधव उपस्थित होते.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन भुसावळ शहरातील नागरिकांना रुग्णास दवाखान्यात ने – आण करण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने उपचारासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते रुग्णाना व त्यांचे नातेवाईक यांना त्रास होवू नये ही निःस्वार्थ व समाजभिमुख भावना लक्षात घेवून नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी रुग्णवाहिका सप्रेम भेट दिली आहे.
या रुग्णवाहिकेमध्ये सर्व अत्यावश्यक सोईंसह ऑक्सिजन , डॉक्टर तसेच पेट्रोल मोफत राहणार आहे .गरजू नागरिकांनी आवश्यकता भासल्यास केव्हाही संपर्क साधावा आपल्या सेवेला अहोरात्र रुग्नवाहिका असेल , समाज सेवा हीच ईश्वर सेवा आहे हे ध्येय समोर ठेवून कोरोनाच्या काळात ही सेवा नागरिकांसाठी मोफत सुरू करण्यात आली असल्याचे ठाकुर यांनी यावेळी सांगितले .
कोरोनाचे पार्श्वभूमिवर शासकीय नियमांचे पालन करून कार्यक्रमास खडका येथील उद्योजक सुरतसींग पाटिल .राजेन्द्र नाटकर,किरण कोलते, जयंती अध्यक्ष निखील राजपुत , खडका येथील पत्रकार अमोल पाटिल.अनुपसींग ठाकूर.सुरेन्द्रसींग पाटिल.प्रदिप पाटिल.नरवीरसींग राऊळ.संजयसींग पाटिल, संदिप राणा, दामोदर राजपूत , चंदुसींग चव्हाण , विकी राजपुत , सोनी ठाकूर , मोहन ठाकुर , सागर ठाकुर , देवेश ठाकुर , गणेश पाटिल, विशाल राजपुत , नकुल राजपुत ,अरुण धनगर , जुगल ठाकुर , संजु ठाकुर , उद्धवसिंग ठाकुर , मंगल सिंग ठाकुर , कैलास भोळे देविदास भोळे , कंडारी चंदू सीग बोरसे, सोनू सिंह पाटिल , देवेश ठाकुर , सुरेश सिंह ठाकुर ,सुरेंद्र सिंह पाटिल, निखील राजपूत , आनंदा सिंह पाटिल , यांच्या सह भुसावळ शहर व तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *