भुसावळ (प्रतिनिधी )-
अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर भुसावळ शहरात लसीकरणास आज गुरुवार ६ मे रोजी सुरवात झाली मात्र पहिल्या टप्प्यात पहिला डोस झाल्या नंतर दुसऱ्या डोसकरीता व अनेकांना पहिल्या डोस करीता खुप प्रतिक्षेनंतर शहरात लस आल्याने नागरिकांनी केंद्रावर एकच गर्दी केली लोकांची झुंबड उडाल्याने प्रशासनाची नियंत्रण करण्यास चांगलीच दमछाक झाली .
ऑनलाईन नोंदणी करूनच लसीकरण केंद्रावर यावे अशा स्वरूपाची विनंती प्रशासनाच्यावतीने केली जात आहे तरीही लसीकरण केंद्रावर नोंदणी नं करता अनेक जण प्रामुख्याने जेष्ठ नागरिक , लसीकरणास गर्दी करताना दिसून येत आहेत .
शहरातील पाच ठिकाणी लसीकरण सुरू असून दोन ठिकाणी दुसऱ्या डोस चे नियोजन तर एका ठिकाणी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी पहिल्या डोसच्या लसीकरणाची नियोजन करण्यात आले आहे ,
असे असतानाही सर्वच लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची गर्दी होत असल्याचे पहावयास मिळत आहे
कोरोनाचा संसर्ग वाढलेला असतांना लसीकरण केंद्रावर नागरिकांनी केलेल्या गर्दी व गोंधळामुळे सोशल डिस्टनसिंगचा चांगलाच फ़ज़्ज़ा उडाल्याने कोरोणाचा संसर्ग नक्कीच वाढनार याची शक्यता नाकारता येत नाही .
प्रशासनाने याकरीता त्वरीत उपाययोजनां अमलांत आणावी अशीही मागणी होत आहे .



