भुसावळ -(प्रतिनिधी )-
ट्रेनमध्ये प्रवास करणा-या प्रवाशांनी चढताना, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानावर कोविड -१९ संबधीत नियमांचे पालन करावे.

आता, पश्चिम बंगाल सरकारने, पश्चिम बंगाल मध्ये रेल्वे ने येणाऱ्या प्रवाशांसाठी ट्रेन सुटण्याच्या ७२ तासांच्या आत घेतलेल्या आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत घेऊनच प्रवास करण्यासाठी एडवायजरी जाहीर केली आहे.
याव्यतिरिक्त, राज्य सरकारांनी आपापल्या राज्यात लांब पल्ल्याच्या गाड्यांद्वारे प्रवास करणा-या प्रवाशांसाठी प्रवासी सूचना (Travel Advisory) जारी केले आहेत.
राज्यांप्रमाणे नवीनतम सूचना
http://contents.irctc.co.in/en/stateWiseAdvisory.html
या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवास करणार्या प्रवाशांना सल्ला देण्यात येत आहे की, त्यांनी त्यांच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड -१९ योग्य वर्तनाचे अनुसरण करावे.
–


