भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वेने पुढील अतिरिक्त विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भुसावळ -पुणे विशेष गाडी ची सेवा ३०.७.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे

- 01136 पुणे – भुसावळ विशेष (शुक्रवार) सेवा दि. ७.५.२०२१ पासून ३०.७.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे आणि
- 01135 भुसावळ – पुणे विशेष (गुरुवार) सेवा दि. ६.५.२०२१ पासून २९.७.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
तसेच
अ) 01451 पुणे – दानापूर विशेष (बुधवार) दि. ५.५.२०२१ पर्यंत (१ फेरी) वाढविण्यात आली आहे.
ब) 01310 दानापूर – नागपूर विशेष (शुक्रवार) दि. ७.५.२०२१ पर्यंत (१ फेरी) वाढविण्यात आली आहे.
या विशेष गाड्यांच्या संरचनेत, थांब्यांमध्ये आणि वेळेमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
आरक्षण : पूर्णत: आरक्षित 01451 च्या विशेष वाढीव फे-यांसाठीचे विशेष शुल्कासह बुकिंग आणि 01136, 01135 या विशेष गाड्यांचे साधारण शुल्कासह बुकिंग दि. १.५.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड १९शी संबंधित सर्व नियमांचे व एसओपी पाळण्याचा सल्ला दिला जात आहे.


