कोरोना जिल्ह्यात 21 रुग्णांचा मृत्यू ; कोरोना बाधीत 1104 रुग्ण आढळले, 24 तासात 1058 रुग्णांची मात


जळगाव –
जिल्ह्यात 24 तासात नव्याने 1104 नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात तब्बल 21 रुणांचा मूत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 1976 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 11 हजार 528 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 98 हजार 420 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर मंगळवारी एकाच दिवसात 1058 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात 21 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यात तब्बल 17 हजार 290 संशयीतांची चाचणी करण्यात आली. मंगळवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 181
जळगाव ग्रामीण 26
भुसावळ 132
अमळनेर 93
चोपडा 75
पाचोरा 47
भडगाव 37
धरणगाव 41
यावल 44
एरंडोल 46
जामनेर 83
रावेर 55
पारोळा 59
चाळीसगाव 69
मुक्ताईनगर 49
बोदवड 51
अन्य जिल्हा 16

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *