नविन चारचाकी वाहन आमदार शिरीष चौधरी यांचे हस्ते रावेर पोलीस ठाण्याकडे सुपूर्द ;

रावेर,-

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतुन रावेर पोलीस ठाण्यास मिळालेल्या नविन चारचाकी वाहनाचे आमदार शिरीष चौधरी यांचे हस्ते पुजन होवुन सदर वाहन हे रावेर पोलीस ठाण्या कडे सुपूर्द करण्यात आले. 

    महाराष्ट्र मध्यप्रदेश सिमेवर असलेले रावेर शहर संवेदनशील आहे. तसेच या पोलीस ठाण्यातंर्गत पन्नास पेक्षा जास्त गावे येतात.रावेर पोलीस ठाण्यास नवीन वाहणाची गरज होती. 

      दरम्यान जिल्हा नियोजन समितीच्या निधीतुन रावेर पोलीस ठाण्यास नविन बोलेरो जिप मिळालेली असुन या नवीन वाहनाचे  आमदार शिरीष चौधरी यांचे हस्ते पुजन करण्यात आले व सदर जिप रावेर पोलीस स्टेशन कडे सुपूर्द करण्यात आली. या प्रसंगी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहा. पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक मनोहर जाधव, काॅग्रेस तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज,:संतोष पाटील तसेच  रावेर पोलीस ठाण्यातील अधीकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *