रावेर तालुक्यातील ग्राम पंचायतींना १५ वित्त आयोगातुन ऑक्सिजन सिलेंडर व बेड खरेदी करण्याची परवानगी मिळावी ; सरपंच संघटनेची मागणी ; गट विकास अधिकारी यांना दिले निवेदन ;

    रावेर (प्रतिनिधी )-

रावेर तालुक्यातील ग्राम पंचायतींना १५ वित्त आयोगातुन ऑक्सिजन सिलेंडर व बेड खरेदी करण्याची परवानगी देण्याची मागणी सरपंच संघटनेने गट विकास अधिकारी यांच्या कडे केली आहे.

          या बाबत गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांना  संघटने तर्फे दिलेल्या निवेदनात नमुद  केलेले आहे की, कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला असुन ऑक्सिजन वेळेवर न मिळल्यामुळे अनेक लोकांचा मृत्यु होत आहे.तसेच रावेर ग्रामीण ऑक्सिजन सेंटर बेड उपलब्ध होत नसल्याने कोरोना पेशंटच्या रुग्णाची हाल होत असून रावेर तालुक्यातील ग्राम पंचायतींना १५ वित्त आयोगातुन ऑक्सिजन सिलेंडर व बेड खरेदी करण्याची परवानगी देण्याची मागणी सरपंच संघटनेने गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांच्या कडे केली आहे.

     निवेदन देतांना हरलाल कोळी, संदीप सावळे सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रमोद चौधरी,सचिव महेंद्र पाटील, सरपंच गणेश महाजन,सरपंच निळकंठ चौधरी,श्रीकांत महाजन, किर्ती पाटील, योगेश पाटील, अमोल पाटील, स्वप्निल पाटील, धनराज पाटील, मंगल वाघोदे आदी सरपंच उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *