भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील किन्ही शिवारात येथील तालुका पोलिसांनी हातभट्टी अड्डयावर
धडक कारवाई करून हातभट्टी दारू व रसायनासह अंदाजे 1,12300 /- रुपयांचा माल जप्त केला आहे .
तालुका पोलीस स्टेशन 5.45 वाजेच्या सुमारास किन्ही शिवारात नाल्याच्या काठावर संशयित आरोपी इब्राहिम हसन गवळी रा.कन्हाळा हा गावठी हातभट्टीची दारू गाळण्याचीे भट्टी रचुन पेटत्या चुलीवर हातभट्टीची दारू गाळतांना गूळ,मोह,नवसागर मिश्रित कच्चे पक्के रसायनचे 17 ड्रम यामध्ये 3300 लिटर रसायन व गावठी हातभट्टीची 20 लिटर तयार दारू असे ड्रम सह अंदाजे किंमत 1,12300 /- रु चे मालासह मिळुन आल्याने. त्याचे विरुद्ध प्रोव्ही कायदा अन्वये कलम 65 फ, ब, क, ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सपोनि अमोल पवार,पोहेकाँ विठ्ठल फुसे,संजय मेढे,विनोद पाटील, रशीद तडवी,जावेद शेख यांनी केली आहे.



