वरणगाव : आयुध निर्माणी वसाहत शेजारील अन्नपुर्णा नगर मधील रहिवाशी उच्च शिक्षीत तरुणीने राहत्या घरात गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना सोमवार रोजी घडली

याबाबत वृत्त असे की अन्नपुर्णा नगर मधील रहिवाशी उच्च शिक्षीत तरुणी शिमरण भारत बोदडे ( २१ ) या तरुणीने सोमवार रोजी दुपारी ३ .१० वाजेच्या सुमारास घरी कुणीही नसताना आपल्या राहत्या घरात गळफास लावुन आत्महत्या केली.
याबाबत रतन पवनकुमार बोदडे याच्या खबरीनुसार वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली. असुन घटनेचा पुढील तपास पो हे कॉ नरसिंग चव्हाण, अतुल बोदडे हे करीत असुन आत्महत्येचे नेमके कारण समले नाही तर मयत शिमरण ही नाशिक येथे उच्च शिक्षण घेत असुन तीचे आई वडिल व भाऊ हे लग्नाच्या सोयरीक संबधा साठी बाहेर गावी गेल्याचे समजते .


