यावल तालुक्यातील अंजाळे येथील डॉ भास्कर पाटील यांचा मुंबई म.न.पा. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या हस्ते सत्कार ;

मुंबई –
दहिसर जम्बो कोविड रुग्णालयांत आता पर्यंत ५००० कोविड रुग्णांवर उपचार करण्यात आला असून या केलेल्या कार्यासाठी यावल तालुक्यातील मूळ गांव अंजाळे येथील डॉ भास्कर पाटील यांचा 12 फेब्रुवारी 2021 रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिर येथे झालेल्या समारंभात मुंबई म.न.पा. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कोविड-१९ महामारी शी झुंज देण्यासाठी देशातल्या सर्वात जास्त घनता असलेल्या मुंबई शहरातल्या जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने दहिसर येथे ‘दहिसर जम्बो कोविड रुग्णालय’ उभारले.
या रुग्णालयात, कोविडच्या संपर्कात आल्यामुळे संशयित कोविड रुग्ण आणि मंद कोविड आजारापासून ते अगदी गंभीर कोविड आजार असल्यामुळे क्रिटिकल झालेल्या रुग्णांपर्यंत सर्वांसाठी दाखल करून उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
लॉकडाउनच्या कठीण समयी असे रुग्णालय उभारून चालवणे जिकरीचे कार्य. काही प्रमाणात डॉक्टर व इतर आरोग्यसेवक स्वतः कोविडग्रस्त झाल्यामुळे रुग्णालय कार्यरत करण्यासाठी अनुभवी डॉक्टरांची उणीव भासत असतांना, मुंबई सेंट्रल येथील टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या
भुलशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. भास्कर मुरलीधर पाटील यांना महालक्ष्मी रेस कोर्स कोविड रुग्णालयाला कार्यरत करण्यास पाठवण्यात आले. तसे झाल्यानंतर त्यांना मुंबईच्या उत्तरेत असलेल्या दहिसर जम्बो कोविड रुग्णालयाच्या अतिरिक्त अधिष्ठाता पदाची जबाबदारी देण्यात आली. या पूर्वी नायर हॉस्पिटल येथील कोविड झालेल्या गर्भवतींचे जगात सर्वात जास्त सीझरेन डिलिव्हरी करणाऱ्या टीम मध्ये सुद्धा त्यांनी लॉकडाउन च्या काळात भुलतज्ञ म्हणून कार्य केले होते.
कोविड काळात उल्लेखनीय कार्य करणारे प्रा . डॉ भास्कर पाटिल यांचे कार्याचे मित्रपरीवारातर्फे सर्व स्तरातून कौतुक होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *