भंगार विक्रेत्यांनी कागदपत्रे सादर न केल्यास सोमवारी होणार गुन्हे दाखल ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
पोलिसांनी मंगळवारी शहरातील 13 भंगारवाल्यांकडे छापे टाकून संशयीत मुद्देमाल ताब्यात घेतला, मात्र त्या मुद्देमालाच्या पावत्या भंगार व्यावसायीकांकडे नसल्याने त्यांना पावत्या आणि गाड्यांचे आरसीबुक जमा करण्याच्या सूचना दिल्या आहे. जर आरसीबुक जमा न झाल्यास रविवारी, सोमवारी संबंधितांविरूध्द गुन्हे दाखल केले जातील, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
शहरातून मोटर सायकलच्या चोरीचे प्रमाण वाढले असल्याने मंगळवारी सहा. पोलिस अधीक्षक अर्चीत चांडक, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर आणि बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दितील भंगार व्यावसायीक यांच्या गोदामांची अचानक तपासणी केली. यात पोलिसांना तपासणी दरम्यान मोंठ्या प्रमाणावर मोटर सायकल, कार, रिक्षा, इलेक्ट्रीक मोटर बॉडी, दुचाकी वाहनांचे स्पेअर पार्ट, इंजीने, पाईप, अ‍ॅगल, तारेचे बंडल, जनरेटर, संगणक आदी साहित्य संशयीतरित्या मिळाले. याप्रकरणी पोलिसांनी शहर आणि बाजारपेठ पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हे दाखल करून न्यायालयाकडून या प्रकरणी चौकशीची परवानगी घेत 13 भंगार व्यावसायीकांची चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी व्यावसायीकांना गाड्यांचे कागदपत्रे, आरसी बुक सादर करण्याच्या सूचना केल्या आहे. रविवारपर्यत जर संबधित भंगार व्यावसायीकांनी पोलिसांकडे आरसी बुक आणि अन्य कागदपत्रे जमा केली नाही तर त्याच्या विरूध्द रविवारी अथवा सोमवारी कलम 124 नुसार गुन्हा दाखल करणार आहे. असे पोलिस सूत्रांनी सांगितले. बाजारपेठ पोलिस ठाण्यातील भंगार विक्रेत्यांची चौकशी सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, समाधान पाटील करीत आहे तर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भंगार व्यावसायीकांची चौकशी हवालदार सुपडा पाटील करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *