हभप भरत महाराज यांच्या हस्ते पत्रकार जितेंद्र काटे यांचा सत्कार !


भुसावळ ( प्रतिनिधी ) –

तालुक्यातील सुनसगाव येथे नुकत्याच संपन्न झालेल्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाच्या सांगता समारोह प्रसंगी श्री क्षेत्र कुंडलेश्वर भगवान वै झेंडूजी महाराज संस्थान बेळी मुख्यसेवक हभप भरतजी महाराज यांच्या हस्ते पत्रकार जितेंद्र काटे यांचा सत्कार करण्यात आला .
येथील महिला गृप ने ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन केले होते या सप्ताहात झालेल्या नामसंकीर्तन व किर्तनकार यांच्या वाणीतून निघालेल्या संतांच्या विचारांची आणि जनजागृतीच्या माध्यमातून महाराजांनी केलेल्या भाविकांचे मनपरिवर्तन व समाज जागृती या विषयावर सप्ताहाची माहिती बातमी व्दारे प्रसारीत करण्याचे काम सुनसगाव येथील दै देशदूत पत्रकार जितेंद्र काटे यांनी केले याची दखल घेत हभप भरत महाराज यांच्या हस्ते महिला गृप च्या माध्यमातून श्रीफळ ,उपरणे देऊन सत्कार करण्यात आला यावेळी श्री हरी टेन्ट चे संचालक दिपक पाटील , दिलदार मित्र मंडळाचे ईश्वर काटे , शांताराम नारखेडे यांचाही सत्कार करण्यात आला . यावेळी भजनी मंडळ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जितेंद्र काटे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *