भुसावळ (प्रतिनिधी )
12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेच्या माध्यमातून भुसावळ येथे संवाद व मार्गदर्शन करणार आहेत. त्याकरिता सभेच्या तयारीसाठी बुधवार दिनांक 10 रोजी भुसावळ येथे संतोषभाऊं च्या यावल रोड वरील तापी किनाऱ्यावरील बंगला येथे दुपारी 4 वाजता नियोजन बैठक आयोजित केलेली आहे . या बैठकीस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील , माजी आमदार संतोष चौधरी मार्गदर्शन करणार आहेत
तरी भुसावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सेल्सचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, कार्यकारीणी पदाधिकारी, राष्ट्रवादी वर प्रेम करणारे सर्व कार्यकर्त्यांनी बैठकीला उपस्थिती द्यावी, असे आवाहन तालुकाध्यक्ष दीपक मराठे, कृउबा सभापती सचिन चौधरी, शहराध्यक्ष
नितीन धांडे यांनी केले आहे.



