भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील क़ुर्हे पानाचे गावातील तलाठ्यासह कोतवालास 240 रुपयांची लाच घेताना जळगाव एसीबीच्या पथकाने सोमवारी रंगेहाथ अटक केली होती. आरोपींना दुसर्या दिवशी मंगळवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना 12 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तलाठी प्रवीण श्रीकृष्ण मेश्राम (41, रा.सपना नगर, प्रभाकर हॉल जवळ, भुसावळ) व कोतवाल प्रकाश दामू अहिर (45, रा.अंबिका नगर, कुर्हे पानाचे, ता.भुसावळ) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. तक्रारदार कुर्हेपानाचे गावातील 38 वर्षीय शेतकरी असून त्यांनी त्यांच्या शेतावर गावातील वाजी विकास सोसायटीचे कर्ज घेतलेले होते मात्र कर्ज फेड करण्यात आल्यानंतर त्यांनी सातबारा उतार्यावरील कर्जाचा बोझा कमी करण्यासाठी तलाठी कार्यालयात संपर्क साधला असता आरोपी तलाठी व कोतवाल यांनी 28 डिसेंबर 2021 रोजी पंचांसमक्ष 240 रुपयांची लाच मागितली होती. आरोपींनी सोमवारी लाच घेतात त्यांना तलाठी कार्यालयातून अटक करण्यात आली. आरोपींना मंगळवारी न्यायालयाने 12 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तपास जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निलेश लोधी करीत आहेत.



