भुसावळ (प्रतिनिधी )-
क्षत्रिय मराठा समाज फाउंडेशन, भुसावळ यांच्यावतीने सालाबादाप्रमाणे यंदादेखील महिलांसाठी हळदी कुंकूच्या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच नवा सातारा, ओंकारेश्वर मंदिरावर करण्यात आले. या प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र गायकवाड, सचिव संतोष सिंगारे, समाजाचे युवा नेतृत्व तुषार सर्जेकर (अप्पा), सुधीर दांडवेकर, निलेश जाधव, राजु गायकवाड, जितु काळे यांच्याहस्ते दीप प्रज्वालन व पूजन करण्यात आले. तुषार सर्जेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



