भुसावळात पानटपरीतून अडीच हजारांचे मद्य जप्त ; ड्रायडेला पोलिसांची धडक कारवाई ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त ड्राय डे असताना शहरातील साने गुरूजी चौकाजवळील शनी मंदिराजवळ एका पानटपरीत मद्य विक्री होत असल्याची माहिती सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत नितीन गंगाराम लोखंडे 51, पोलिस नगर, साईबाबा मंदिराजवळ, सोमनाथ नगर, भुसावळ यास अटक करीत त्याच्या ताब्यातून दोन हजार 520 रुपयांचे देशी-विदेशी मद्य जप्त करण्यात येवून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीच्या ताब्यातून 280 रुपये किंमतीची ऑफिसर चाईस ब्लू कंपनीच्या दोन क्वार्टर, 360 रुपये किंमतीची ऑफिसर चाईस कंपनीच्या तीन क्वार्टर, एक हजार 20 रुपये किंमतीच्या स्ट्रेलिंग रिझर्व्ह कंपनीच्या सहा क्वार्टर, 280 रुपये किंमतीच्या डीएसपी ब्लॅक कंपनीच्या दोन क्वार्टर, 450 रुपये किंमतीच्या मॅकडॉल व्हिस्की कंपनीच्या तीन क्वार्टर, 130 रुपये किंमतीची मॅकडॉल कंपनीची एक क्वॉर्टर जप्त करण्यात आली. प्रशांत सोनार यांच्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत सोनार, रमण सुरळकर, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्‍वर भालेराव आदींच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *