भुसावळातील गोळीबार प्रकरण : हंसराज खरातसह दोघांना पोलिस कोठडी ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ रेल्वे स्थानकाबाहेरील पार्किंगमध्ये काम करणार्‍या तरुणास गावठी कट्ट्याचा धाक दाखवत मारहाण करून दर महिन्याला पाच हजार रुपये खंडणीपोटी हप्ता देण्याची मागणी केल्याप्रकरणी हंसराज खरात व अमोल श्याम खिल्लारे उर्फ चिन्नाविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल होता. बुधवार, 6 जानेवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. गुन्ह्यात वापरलेला कट्टा संशयीतांनी आरोपी विल्सन जोसेफला दिल्याची बाब तपासात निष्पन्न झाली होती तर जोसेफसह अन्य चार आरोपी दरोडा टाकण्याच्या उद्देशात असतानाच पोलिसांच्या जाळ्यात अडकले होते. पोलिस चौकशीत आरोपींनी हा कट्टा हंसराज खरात व चिन्नाने दिल्याची कबुली दिल्यानंतर त्यांना दरोड्याच्या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले होते. सोमवारी दोघा आरोपींना पोलिसांनी या गुन्ह्यात अटक करीत न्यायालयात हजर केले असता त्यांना 3 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी हंसराज खरात व अमोल उर्फ चिन्ना खिल्लारे यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. सोमवारी आरोपींना शहर पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यात ट्रान्सपर रीमांडच्या आधारे ताब्यात घेत न्या.एस.वाय.सुळ यांच्या न्यायासनापुढे हजर केल्यानंतर त्यांना 3 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकारतर्फे अ‍ॅड.ए.ए.चुकेवाड तर आरोपींतर्फे अ‍ॅड.सत्यनारायण आर.पाल यांनी काम पाहिले. दरम्यान, शहर हद्दीत दरोड्याच्या गुन्ह्यातील विल्सन जोसेफ, राकेश बारे, भूषण मोरे, सागर पारधे व ऑस्टीन रामटेके यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *