भुसावळ (प्रतिनिधी )-
अन्याय व अत्याचारग्रस्त पिडीत महिलांनी पोलिस स्टेशनला न घाबरता तक्रार दाखल करण्यास पुढे यावे यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळवून देता येईल असे आवाहन नूतन आयपीएस सहाय्यक पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांनी केले.
स्थानिक बाजारपेठ पोलिस स्टेशन येथे सोमवार रोजी महिला दक्षता समितीच्या मिटींगचे आयोजन एएसपी अर्चित चांडक तसेच पो नी दिलीप भागवत यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते .
दरम्यान दक्षता समिती मधील महिला सदस्यांनी कामकाज करतांना महिलांना येणाऱ्या अडचणी , समस्या वजा सुचना मांडल्यात.तसेच पोलिस विभागातर्फे कायदा व सुव्यवस्थेच्या माध्यमातून दक्षता समितीतील महिलांना कामकाजात येणाऱ्या अडचणी व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करु अशी ग्वाही यावेळी देण्यात आली .
महिला दक्षता समितीच्या वतिने श्री चांडक यांचा स्वागत करण्यात आला. बैठकीस पत्रकार उज्वला बागुल ,महिला प्रतिनिधि ॲड.जास्वंदी भंडारी सौ संगीता भामरे , राजश्री सुरवाड़े , सौ टिना धांडे , एडव्होकेट अश्विनी डोलारे, सौ.सुरेखा ठाकुर व इतर महिला सदस्य उपस्थित होत्या .
यशस्वितेसाठी पो कॉ सचिन पोळ व परदेशी यांचेसह पोलिस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .




