भुसावळ (प्रतिनिधी)

जळगांव जिल्ह्यात गावराणी तूप विकणारी महिलांची टोळी सक्रिय झाली असून आता भुसावळ शहरात सुद्धा ही टोळी दाखल झाली असल्याचे दिसून येत आहे .
,जळगांव जिल्ह्यातील पाळधी व नशिराबाद या गावांमध्ये या टोळीने महिलांना तूप दाखविण्याचा बहाणा करून घरातील दागिने लांबविल्याचा प्रकार काही दिवसापूर्वी उघड झाला आहे.यानंतर सदर टोळी भुसावळ शहरात दाखल झाल्याची शक्यता नाकारता येत नाही .या
तुप विकणाऱ्या महिला दिवस भरातून शहरातील घरांची पाहणी करून त्यांच्या सोबत असलेल्या काही महिला तूप दाखवीत असतांना समोरील महिलेस संमोहित करून त्यांचे अंगावरील अथवा घरातील दागदागिने लांबविण्याचा प्रकार सुरू आहे.भुसावळात ही टोळी दाखल झाल्याच्या संशयावरून शहरामध्ये कुठेही स्वस्तात गावराणी तूप विकणाऱ्या महिला दिसल्यास त्वरीत बाजारपेठ पोलीस स्टेशन भुसावळ या भ्रमणध्वनी क्रमांक (02582) 222399 वर संपर्क साधण्याचे आवाहन एएसपी अर्चित चांडक व पो नि दिलीप भागवत यांनी केले आहे.


