भुसावळ (प्रतिनिधी )-
विश्व स्वास्थ्य संघटन द्वारा घोषित केलेल्या कोविड 19 महामारी ची सुरुवात आणि परिणाम स्वरूप लॉकडाऊन मुळे दिनांक 22 मार्च 2020 पासून ई कॅटरिंग ची सुविधा बंद करण्यात आली होती. यात्री गाडी क्रमश: पुन्हा सुरू झाल्यामुळे आणि यात्री ची मागणी नुसार आयआरसीटीसी द्वारा टप्प्याटप्प्याने ट्रेनमध्ये ई-केटरिंग सेवा सुरु करण्यात येत आहे.

हि सेवा दिनांक 01.02.2021 पासून भुसावळ विभागातील भुसावळ आणि बडनेरा स्थानकांवर पुन्हा सुरू केली जात आहे.
यात्री www.ecatering.irctc.com च्या माध्यम द्वारे ई-कॅटरिंग सेवा मिळवू शकतात. दूरध्वनी क्रमांक 1323 च्या माध्यमातून ऑर्डर करू शकता . यात्री आयआरसीटीसी ई-कॅटरिंग अँप “फूड ऑन ट्रॅक” विभिन्न एप स्टोर द्वारे डाउनलोड करू शकता आणि ई-कॅटरिंग सेवांचा लाभ घेऊ शकता प्रवाशांच्या सोयीसाठी कॅश-ऑन डिलिव्हरी पर्यायसुद्धा दिला आहे.


