भुसावळ –
शहरातील पंधरा बंगला परीसरातील एजीएस हायस्कूलजवळील रहिवासी सागर सिध्दार्थ साळुंखे (29) या युवकाने राहत्या घरात पंख्यास गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी 10 ते 10.30 या वेळात घडली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.सागर याने रविवारी त्यांच्या राहत्या घरात पंख्यास दोर बांधून गळफास घेतला. याबाबत बाजारपेठ पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक गणेश भोये, प्रणय पवार यांनी पंचनामा केला. याप्रकरणी सिध्दार्थ बळीराम साळुंखे यांनी दिलेल्या माहितीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सहा.पोलिस निरीक्षक गणेश भोये पुढील तपास करीत आहे.



