भुसावळातील सायली हॉटेलमध्ये ड्राय डेला दारू विक्री ; दोघांविरुद्ध गुन्हा –


भुसावळ –
शनिवारी ड्राय डे असतांनाही येथील वरणगाव रोडवरील हॉटेल सायलीवर दारूची विक्री होत असल्याची माहिती कळताच सहाय्य पोलिस अधीक्षक अर्चित चांडक व पोलिस अधिकार्‍यांनी रात्री 10.30 वाजता छापा टाकून 2 हजार 150 रूपयांची विदेशी मद्य पकडले. याप्रकरणी दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी ड्राय डे असतांना सुध्दा वरणगाव रोडवरील हॉटेल सायलीवर दारू विक्री होत असल्याची गुप्त माहिती सहायक पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी हॉटेलवर एक डमी ग्राहक पाठवून बाटली मागविली, बाटली मिळाल्याची खात्री झाल्यावर आयपीएस अधिकारी चांडक, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, सहा.पोलिस निरीक्षक अनिल मोरे आणि पोलिस कर्मचारी यांना सोबत घेत हॉटेलवर गेले असता तेथून दोनहजार 150 रूपये कींमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्यात. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी अक्षय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीवरून पीटर कलमेट अ‍ॅथोनी (रा. पंधरा बंगला, भुसावळ) व देविदास सोपान भारंबे (रा.त्रिमूर्ती नगर, भुसावळ) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, समाधान पाटील पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *