ग्राहक हिताच्या कार्यात स्व:तला झोकून द्या- विकास महाजन ग्राहक कल्याण फाऊंडेशन च्या जिल्हा बैठकीत आवाहन.


अमळनेर प्रतिनिधी-
ग्राहक कल्याण फाऊंडेशन जळगाव जिल्हा कार्यकारिणीची बैठक रविवार दि.31 जानेवारी रोजी भारतातील अती प्राचीन,अती दुर्मीळ आणि जागृत श्री.मंगळदेव ग्रह मंदीर,अमळनेर येथे संपन्न झाली त्यावेळी महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकिय विकास महाजन (पारोळा) यांनी मार्गदर्शन केले.
ग्राहक संरक्षण क्षेत्रात काम करत असताना नेहमीच ग्राहक हिताला प्राधान्य द्यावे. ग्राहक शिक्षणाला महत्व दिले जावे.जेणेकरुन ग्राहक ख-या अर्थाने जागृत होईल .
बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे जळगाव जिल्हा अध्यक्ष हेमंतदादा भांडारकर होते.
अध्यक्षीय भाषणात ग्राहक कल्याण फाऊंडेशन च्या कार्यकर्त्यांना लवकरच होणा-या राज्यस्तरीय अभ्यास वर्गासाठी तयार राहण्याची सुचना केली.
प्रास्ताविक अमळनेर तालुका अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी केले.
बैठकीला जिल्हा सचिव Adv.जास्वंदी भंडारी (भुसावळ),मंगळ्देव ग्रह मंदीर, अमळनेर संस्थांनचे अध्यक्ष डिगंबर महाले , डॉ.अविनाश जोशी यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीला ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे जळगाव जिल्हा कार्यवाह प्रा.डॉ.अविन्त पाटील (जळगाव),कार्याध्यक्ष अशोक महाजन (रावेर) , पत्रकार कैलास महाजन,कुंदनसिंह ठाकुर (एरंडोल),मनोज महाजन (पिंपळी),सूनील पाटील (सावदा) ,यांच्यासह तालुका अध्यक्ष सौ.आरती ठाकुर (एरंडोल), योगेश महाजन (चोपडा),संजय झोपे (यावल) ,प्रा.डॉ.अर्चना भोसले (जळगाव), विजय पाटील (रावेर) , चोपडा शहर अध्यक्षा,नगरसेविका सौ.संध्याताई महाजन,सौ.शिरसाठ, Adv.निलेश भंडारी ,डॉ.यावलकर (भुसावळ ),प्रल्हाद महाजन (रावेर) , कैलास महाजन (चोपडा),अमळनेरचे सेवा निवृत्त तहसीलदार आर.जी.चव्हाण,नगरसेविका सौ.महाजन,महेश पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी सौ.शिंदे, मुख्याध्यापक शिंदे ,डॉ.अपर्णा मुठे,सहारा न्यूज़ चे वरिष्ठ पत्रकार उमेश धनराळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमळनेर शहर अध्यक्ष प्राचार्य रविंद्र माळी यांनी केले.
आभार प्रा.डॉ.सुभाष महाजन यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *