भुसावळच्या ऍड. नंदिनी चौधरी यांना बार कोन्सिलची सनद !; चौधरीं परिवाराच्या शिरपेचात मानाचा तुरा ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील माजी आमदार संतोष चौधरीं यांची पुतणी व माजी नगराध्यक्ष अनिल चौधरीं यांची सुकन्या ऍड नंदिनी अनिल चौधरी यांना नुकतीच बार कोन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ची सनद मिळाली आहे .नंदिनी यांनी कायद्याचा विविधांगी सखोल अभ्यास करून कायद्याचे ज्ञान प्राप्त केले आहे .
भुसावळचे भूषण असलेल्या ऍड नंदिनी चौधरी या समाजातील अन्यायग्रस्त लोकांना त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी वकिली व्यवसाय करणार आहेत .कायद्याचे राज्य स्थापित राहण्यासाठी , कायदाचा आदर वाढविण्यासाठी परिश्रम करणार आहेत .एक तरुण ,तडफदार महिला वकील व्यवसायात पदार्पण करत असून त्या महिलांना त्यांचे अधिकार , स्वातंत्र्य आणि हक्काची जाणीव करून देण्यासाठी समाज प्रबोधन करणार आहेत
नंदिनी चौधरीं यांनी ठेवला युवापिढी समोर आदर्श
एलएलएम करून गोरगरीब जनतेचे खटले न्यायालयात चालवून आपल्या अनुभवाचा त्यांना फायदा मिळवून देण्याचा निश्चय त्यांनी केला आहे.
जीवनाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन, शिकण्याची आवड, चिकाटी, स्वावलंबन, स्वयंसिद्धता असे अंगीकृत गुण असलेल्या या स्वभावामुळे नंदिनी यांनी हा टप्पा गाठला आहे. चौधरीं परिवाराचा राजकीय वसा असे समीकरण असले तरीही केवळ राजकारणात करिअर न करता आपण वेगळे काही करायचे हे ठरवून शिक्षिण घेत नंदिनी यांनी मुंबई विद्यापीठात लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत त्यांनी 2020 मध्ये एलएलबी परीक्षा उत्तीर्ण केली. नुकतीच त्यांना सनद प्राप्त झाली आहे .
येत्या काळात एलएलएम ही पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण होण्याचा चंग बाळगला आहे. त्याचप्रमाणे आपले शिक्षण आणि न्यायालयीन कामकाजाच्या अनुभवाच्या बळावर गोरगरीब जनतेसाठी न्यायालयीन खटले लढण्याचे त्यांनी ठरविले आहे. तरूण पिढीने नित्यनेमाने अभ्यास केल्यास आपला प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो असा सल्ला देत नंदिनी चौधरीं यांनी युवापिढी समोर आदर्श ठेवला आहे.
चौधरीं परिवारातील मुले तर उच्चशिक्षित आहेतच त्याचबरोबर नंदिनीने सुद्धा शिक्षणात सनद प्राप्त करून बाजी मारली आहे. ऍड नंदिनी चौधरी याच्या यशाबद्दल माजी आमदार संतोष चौधरीं, माजी नगराध्यक्ष अनिल चौधरीं , बंधू कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन संतोष चौधरीं, धिरज चौधरीं यांचेसह त्यांच्या हितचिंतकांनी व शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *