भुसावळ (प्रतिनिधी )-
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापनदिन येथील
भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीत उत्साहात संपन्न झाला . यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन संतोष चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्रसंगी उपसभापती अशोक पाटील, संचालक गव्हाणे, उमेश चौधरी, प्रकाश चौधरी, प्रवीण चौधरी, धीरज बर्हाटे, दीपक काटकर, योगेश चौधरी, अनिल तेली, पी.सावकारे, आबा सेठ, व्यापारी, शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते. विशेष म्हणजे यंदा कृउबा आवारात मोठ्या प्रमाणावर सजावट करण्यात आली होती शिवाय व मोठ्या संख्येने नागरीकही उपस्थित होते.



