भुसावळ (,प्रतिनिधी )-
दिनांक 26.01.2021 ला सकाळी 07:51 वाजता मंडळ रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांच्या शुभ हस्ते रेल्वे क्रीडांगण मध्ये झेंडा वंदन करण्यात आले .
यावेळी आरपीएफ कर्मचाऱ्यांनी झेंडा ला वंदन करून सलामी आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांनी परेड ला सुरुवात करण्यात आली . या परेड मध्ये सशस्त्र,निशस्त्र,तथा रेल सुरक्षा बलाच्या तीन तुकडी,रेल्वे स्कूल चे विदयार्थी,
स्काऊट तथा गाईड यांच्या द्वारे परेड करण्यात आली. आणि परेड चे विसर्जन करण्यात आले. यामध्ये डॉग शो चे आयोजन करण्यात आले होते.

मंडळ रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना 72 व्या गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि महाप्रबंधक यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. याप्रसंगी अप्पर मंडळ रेल्वे प्रबंधक मनोज कुमार सिन्हा आणि सर्व विभागाचे सर्व शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .यावेळी मंडळ रेल प्रबंधक द्वारा रोख पुरस्कार ची घोषणा करण्यात आली. आरपीएफ तुकडी क्र 01 ला 2500 चा रोख पुरस्कार,आरपीएफ तुकडी क्र 02 ला रु 2500 चा रोख पुरस्कार, आरपीएफ तुकडी क्र 03 ला रु 2500 चा नगद पुरस्कार,आरपीएफ बँड ला रु 2500 चा नगद पुरस्कार,आरपीएफ परेड डेकोरेशन रु1000 चा नगद पुरस्कार,आरपीएफ डॉग स्कॉड रु 2000 चा नगद पुरस्कार, इंजीनियरिंग विभागाला रु 4000 चा नगद पुरस्कार, कार्मिक विभाग रु 3000 नगद पुरस्कार इलेक्ट्रिक विभाग रु 2000चा रोख पुरस्कार , मेडिकल विभाग रु 2000 चा रोख पुरस्कार, स्काऊट गाईड परेड रु 2500 चा नगद पुरस्कार घोषित करण्यात आले.
यावेळी समारंभाचे सूत्रसंचालन रेल्वे स्कूलचे प्राचार्य सतीश कुळकर्णी यांच्या द्वारे करण्यात आले आणि धन्यवाद आणि आभार प्रदर्शन वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन डी गांगुर्डे यांनी केले. सदर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कल्याण निरीक्षक यांनी परिश्रम घेतले.यावेळी कोरोना संबंधित नियम पाळून गणतंत्र दिवस साजरा करण्यात आला.


