मनसे पदाधिकार्‍यांचा डीआरएम कार्यालयाबाहेर ठिय्या – अधिकार्‍यांनी भेटीसाठी वेळ दिल्यानंतर वादावर पडला ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वे कर्मचार्‍यांच्या समस्या घेवून आलेल्यामनसे पदाधिकार्‍यांना डीआरएम कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर संतप्त पदाधिकार्‍यांनी डीआरएम कार्यालयासमोर तब्बल अर्धा तास ठिय्या मांडून रस्ता अडवला. मनसेच्या पदाधिकार्‍यांनी रेल्वे प्रशासनाविरोधात निदर्शने केल्याच्या अर्धा तासानंतर रेल्वे अधिकार्‍यांनी भेटीसाठी वेळ दिल्यानंतर या आंदोलनावर पडदा पडला.
रेल्वेच्या विविध कर्मचार्‍यांच्या तक्रारी व समस्या मांगण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे मुंबई विभाग अध्यक्ष जितेंद्र पाटील, मनसेचे शहर प्रमुख विनोद पाठक, यावलचे शहराध्यक्ष चेतन आढळकर आदींनी सोमवारी दुपारी डीआरएम कार्यालय गाठले. डीआरएम वा वरीष्ठ अधिकार्‍याशी संवाद होणे अपेक्षीत असताना अधिकारी महत्वाच्या कॉन्फरन्समध्ये असल्याचे सांगून त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने संतप्त झालेल्या मनसेच्या सैनिकांनी डीआरएम कार्यालयाच्या प्रवेशव्दारावरच ठिय्या मांडून रेल्वे प्रशसनाच्या विरोधात निर्दशने केली. यामुळे डीआरएम कार्यालयाचे प्रवेशव्दारातून अर्धा तास प्रवेश बंद होता. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी याबाबत कार्यालयात निरोप पाठवल्यानंतर एडीआरएम व अन्य अधिकार्‍यांनी चर्चेसाठी तयारी दर्शविल्यानंतर हे निदर्शन व ठिय्या आंदोलनावर पडदा पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *