यावल – तालुक्यातील न्हावी येथे आश्रय फाऊंडेशन यावल-रावेर आणी भोळे हॉस्पिटल भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय आरोग्य शिबीर यशस्वी पार पडले. या आरोग्य शिबीर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद जिवराम महाजन हे होते तर उद्घाटन न्हावी गावाच्या लोकनियुक्त सरपंचसौ.भारतीताई नितिन चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी आश्रय फाऊंडेशन, यावल-रावेर अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे,उपाध्यक्ष डॉ विलास पाटील, सचिव डॉ पराग पाटील, डॉ प्रशांत जावळे,डॉ भरत महाजन खजिनदार डॉ राजेश चौधरी, रितेश बारी, आश्रय फॉउंडेशन चे जनसंपर्क अधिकारी सागर लोहार, मनोज बारी उपस्थित होते .
न्हावी येथे दिनांक २१ जानेवारी २o२१ रोजी संपन्न या शिबिरात न्हावी व परिसरातील सुमारे ६० नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येवुन त्यांना विविध आजारांविषयी मार्गदर्शन करण्यात आलीत या एकदिवसीय आरोग्य तपासणी शिबीरास यशस्वी करण्यासाठी आश्रम फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ .कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपदधिकारी तसेच न्हावी ग्रामपंचायतचे सदस्य तथा कर्मचारी वृंद यांनी महत्वाचे परिश्रम घेतले .



