भुसावळ (प्रतिनिधी ) –
रेल्वे खाली दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांची अतिरिक्त गर्दी दूर करण्यासाठी मुंबई/पुणे- हुजूर साहेब नांदेड दरम्यान विशेष गाड्या चालविणार आहे.
1)मुंबई-हुजूर साहिब नांदेड विशेष (दैनिक)
*07618 विशेष दि. 27.01.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दररोज 06.15 वाजता सुटेल आणि हुजुर साहिब नांदेड ला त्याच दिवशी 18.00 वाजता पोहोचेल.
*डाऊन दिशा थांबे* :देवळाली-09.33/09.35,
नाशिकरोड-09.45/09.50,निफाड-10.12/10.14,लासलगाव-10.23/10.25,मनमाड-11.00/11.05
*07617 विशेष दि. 26.01.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत हुजुर साहिब नांदेड येथून दररोज 10.05 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,मुंबई येथे त्याच दिवशी 21.55 वाजता पोहोचेल.
*अप दिशा थांबे* -मनमाड-16.50/17.00,
लासलगाव-17.19/17.20,निफाड-17.34/17.35,
नाशिकरोड-18.02/18.05,देवळाली-18.13/18.15
इतर थांबे :रोटेगाव,लासूर,औरंगाबाद,जालना,परतूर, सेलू,मानवत रोड,परभणी आणि पूर्णा.
संरचनाः २ वातानुकूलित चेअर कार,१६ द्वितीय आसन श्रेणी.
2).पुणे – हुजूर साहिब नांदेड सुपरफास्ट विशेष (द्वि -साप्ताहिक)*
*02729 अतिजलद विशेष दि. 27.01.221 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे येथून सोमवारी आणि बुधवारी 22.00 वाजता सुटेल आणि हुजुर साहिब नांदेडला दुसर्या दिवशी 10.00 वाजता पोहोचेल.
*डाऊन दिशा थांबे* मनमाड-03.25/03.30
*02730 अतिजलद विशेष दि. 26.01.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत हुजुर साहिब नांदेड येथून दर मंगळवार आणि रविवारी 21.30 वाजता सुटेल आणि पुण्याला दुसर्या दिवशी 09.40 वाजता पोहोचेल.
*अप दिशा थांबे* -मनमाड-04.05/04.10
इतर थांबे : दौंडकॉर्ड,अहमदनगर,बेलापूर,कोपरगाव,
औरंगाबाद,जालना,परतुर,सेलू,परभणी आणि पूर्णा.
संरचनाः १ द्वितीय वातानुकूलित, १ तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान, ८ द्वितीय आसन श्रेणी.
आरक्षण : पूर्णपणे आरक्षित ट्रेन क्र.02729 आणि 07618 विशेष गाड्यांसाठी बुकिंग 24.01.2021 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर 10 दिवसांच्या आगाऊ आरक्षणाच्या कालावधीसह सुरू होतील .
*उपरोक्त विशेष गाड्यांच्या सविस्तर वेळ आणि थांब्यांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.



