भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिनांक 23 जानेवारी 2021 रोजी स्व.नेताजी सुभाषचंद्र बोस व सरसेनापती हिंदुहॄदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.
दिनांक 23 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास स्व.नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत,शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे,बंटी कापडणे, किशोर मोरे,किशोर कुमावत,हेमंत जांगडे हे उपस्थित होते.




