भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील नगरपरिषदेच्या सभागृहात दिनांक 23 जानेवारी 2021 रोजी थोर क्रांतिकारक आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व.बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
दिनांक 23 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास भुसावळ नगरपरिषदेच्या सभागृहात थोर क्रांतिकारक आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस व
हिंदूहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार,सभा अधिक्षक परवेज शेख ,बांधकाम विभाग अभियंता विजय तोष्णीवल,आस्थापना विभाग प्रमुख चेतन पाटील,आस्थापना विभाग लिपिक वैभव पवार,देविदास मंदावडे, प्रमोद मेढे व आदी उपस्थित होते.



