भुसावळ -(प्रतिनिधी)

दैनंदिन कार्यामध्ये कुटुंब प्रमुख मग्न असतात सोबत वेळ मिळाल्यानंतर सामाजिक दायित्व लक्षात घेऊन समाजसेवेचे कार्य करीत असतात ही समाजसेवा करताना आपल्या कुटुंबातील जबाबदाऱ्या घरातील इतर कुटुंब सदस्य पूर्ण करत असल्याने कुटुंब प्रमुखाला आधार मिळतो परंतु आपल्या कुटुंबातील सदस्यांकडे देखील लक्ष देण्याची गरज असून त्यांना वेळ दिला पाहिजे यामुळे बाहेर कार्य करताना मोलाची साथ मिळते यामुळे कुटुंबप्रमुखाच्या विकासात कुटुंबाची साथ महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब चे माजी प्रांतपाल राजीव शर्मा यांनी केले
रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळ मधील सदस्यांचे कुटुंबाचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी इनरव्हील असोशियशन ऑफ इंडिया चे माजी प्रेसिंडेट रश्मी शर्मा उपप्रांतपाल धर्मेंद्र मेंडकी रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळ चे प्रेसिडेंट सुधाकर सनंसे प्रोजेक्ट सेक्रेटरी संजय भटकर कोषागार मुकेश अग्रवाल डॉ. सुधीर शर्मा माजी प्रेसिडेंट सुनील शीरनामे प्रदीप सोनवणे किशोर पाचपांडे डॉ. पी व्ही पाटील राजेंद्र परसे आदिल खान ज्योती सोनवणे नूतन फालक आदी उपस्थित होते
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या सदस्यांचे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यामध्ये कोरोना काळात महिलांच्या आरोग्य तपासणी डॉ. वंदना वाघचौरे यांनी केली शिक्षण क्षेत्रामध्ये डीसीपीएस धारकांना स्लीप मिळवून देण्यासाठी योगेश इंगळे यांनी प्रयत्न केले तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये अनुकूल परिस्थितीवर मात करत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग मोकळा करून देत जिल्हा परिषद शाळा शिंदी तालुका भुसावळ येथील समाधान जाधव यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल व वरणगाव येथील मुद्रांक विक्रेते बापू चौधरी यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवन महाजन तर आभार सुनील वानखेडे यांनी मानले
तरुणांनी रोटरॅक्ट मध्ये या
रोटरी क्लब राष्ट्रीय स्तरावरील संघटन असून या माध्यमातून विद्यार्थीदशेत कार्य करण्याची संधी आहे तसेच परदेशात जाण्याची देखील संधी या माध्यमातून उपलब्ध होत असल्याने तरुणांनी रोटरॅक्ट मध्ये आले पाहिजे व आतापासूनच समाजसेवेची सवय जडली पाहिजे
धर्मेंद्र मेंडकी उपप्रांतपाल


