साकेगाव ग्रामपंचायत मंगल कार्यालय लोकार्पण सोहळा संपन्न ; ग्रामस्थांसाठी फक्त अकरा हजार रुपयांत मंगल कार्यालय उपलब्ध होणार;


भुसावळ (प्रतीनिधी )-
खासदार रक्षाताई खडसे व आमदार संजय सावकारे यांच्या फंडातून तालुक्यातील साकेगाव येथे गावासाठी भव्य दिव्य मंगल कार्यालय सभागृह लोकार्पण सोहळा दिनांक 11 डिसेंबर रोजी संपन्न झाला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती मनीषाताई पाटील, पंचायत समिती सदस्य प्रीतीताई पाटील
भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील माजी नगराध्यक्ष युवराजभाऊ लोणारी माजी नगरसेवक राजेंद्र भाऊ आवटे, उपसभापती वंदनाताई उन्हाळे यांचे पती श्री.उन्हाळे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय पाटील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन दिलीप सिंग पाटील माजी सरपंच अनिल पाटील सुभाष कोळी आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती
साकेगाव ग्रामपंचायतीने जिल्हास्तरीय पायाभूत सुविधा पुरस्कार प्राप्त केल्यानंतर राज्यस्तरावर झाल्यानंतर अवघ्या काही गुणांनी प्रथम क्रमांक व मंगल कार्यालयाच्या कमी मुळे राज्यस्तरीय पायाभूत सुविधा पुरस्कार हुकल्याचे माजी सरपंच आनंद ठाकरे यांनी खासदार रक्षाताई खडसे व आमदार संजय सावकारे यांच्या निदर्शनास आणून दिले त्यावर लगेच कर्तव्यतत्पर खासदार व आमदार साहेबांनी प्रत्येकी वीस लाख असे एकूण 40 लक्ष रुपये साकेगाव स्मार्ट व्हिलेज मंगल कार्यासाठी आपल्या फंडातून देऊ केले व मंगल कार्यालय गावाच्या बाहेर चूडामणनगरातील 35000 ओपन स्पेस जागेत बांधकाम सुरू झाले मात्र काही विरोधकांच्या पोटात दुखल्याने त्यांनी मंगल कार्यालय बांधकामाला स्थगिती मिळावी म्हणून या माध्यमातून प्रयत्न केले मात्र ते सर्व प्रयत्न यशस्वी झाले
आणि दिनांक 11 डिसेंबर 2020 रोजी भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त स्मार्ट विलेज मंगल कार्यालय सभागृहाचे भव्य आणि दिव्य लोकार्पण सोहळा संपन्न झाला
ग्रामस्थांना आपल्या मुला-मुलींचे लग्न मंगल कार्यालय व्हावे असे वाटत असते मात्र शहरातील मंगल कार्यालयाचे दर त्यांना पेलवत नसल्या कारणास्तव खेड्यांमध्ये घरासमोर लग्न लावतात आता मात्र आता फक्त अकरा हजार रुपयात ग्रामस्थांसाठी मंगल कार्यालय उपलब्ध होईल असा निश्चय साकेगाव भारतीय जनता पार्टी पदाधिकाऱ्यांनी उद्घाटन प्रसंगी केलेला आहे याबाबत समस्त गावात नागरिकांमध्ये उत्सव व आनंदाचे वातावरण आहे
प्रसंगी आमदार श्री सावकारे साहेब यांनी मनोगत व्यक्त करताना सकेगाव ग्रामपंचायत आदर्श व उत्कृष्ट ग्रामपंचायत असून ग्रामपंचायतीचा विकासाचा आलेख लक्षात घेतात निश्चित भविष्यात स्मार्ट विलेज साकेगाव ग्रामपंचायत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त करेल असा विश्वास त्यांनी मंगल कार्यालय सभागृह लोकार्पण उद्घाटन सोहळ्याप्रसंगी
व्यक्त केला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी सरपंच आनंद ठाकरे सुरेश पाटील माणिक पाटील अनिल सोनवाल संतोष भोळे दिगंबर पाटील गजानन कोळी बळीराम सोनवणे कालू पटेल महेंद्रकुमार प्रमोद चव्हाण सह भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद ठाकरे यांनी केले व खासदार रक्षाताई खडसे व आमदार संजय सावकारे यांचे आभार व्यक्त केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *