ग्राहक दिना निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
ग्राहक पंचायत महाराष्ट्र ,जळगाव जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून जिल्हा स्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .यात खालील प्रमाणे गट व विषय आहे शब्द मर्यादा१००० असून पहिल्या गटात इयत्ता ८वी,९वी,१०वी
विषय:—१)दक्ष ग्राहक
२) ग्राहकांचे अधिकार
आणि कर्तव्य
३) भारतीय ग्राहक चळवळ
दुसरा गट उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालय गट – इयत्ता 11 वी ते 12 वी, शब्द मर्यादा – 1500 शब्द
विषय- 1. ग्राहक राजा जागा हो! 2. तक्रार करणार त्याला न्याय मिळणार!
3. ग्राहक फसवणूकीचे मार्ग व उपाय
तिसरा गट वरिष्ठ महाविद्यालयीन गट, शब्द मर्यादा 2000 शब्द
विषय- 1. ऑनलाइन खरेदी व्यवहारातील धोके आणि उपाय 2. चंगळवाद आणि ग्राहक 3. ग्राहक संरक्षण कायदा-2019 उद्दिष्टपूर्तीसाठी प्रभावी?
वरील प्रत्येक गटातून प्रथम,द्वितीय, तृतीय स्पर्धकांना प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देऊन दिनांक २४ डिसेंबरला सन्मानित करण्यात येणार आहे.
निबंध जमा करण्याची अंतिम तारीख २०/१२/२०२०
आपले निबंध जमा करण्यासाठी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा.
उदयकुमार सूर्यवंशी 9850318392, मिलिंद मांडळकर 8956111005 करण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष मनोज जैन व विभाग संघटक संजय शुक्ल यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *