शिवसेना महाविकास आघाडीसह वरणगाव नगर पंचायतीच्या निवडणुकीत उतरणार -समाधान महाजन ; वरणगाव नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक संबंधी शिवसेनेचे प्रसिद्धी पत्रक जाहिर ;

शिवसेना महाविकास आघाडीसह वरणगाव नगर पंचायतीच्या निवडणुकीत उतरणार -समाधान महाजन ;
वरणगाव नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक संबंधी शिवसेनेचे प्रसिद्धी पत्रक जाहिर ;
भुसावळ (प्रतिनिधी )-
येत्या नजीकच्या काळात वरणगाव नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू आहे वरिष्ठांच्या आदेशान्वये शिवसेना आज सदर निवडणुकीत महाविकास आघाडीशी बांधील आहे असे असतांना असंबंध वावड्या उडवून महाविकास आघाडी बद्दल मतदार नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी काहींची तोंडे सरसावली आहे. आशा प्रकारे एकसंघ महाविकास आघाडीत फूट निर्माण करण्यासाठी वावड्या उठवीणारांचा प्रतिबंध शिवसेना आपल्या शिस्तयुक्त पद्धतीने ठरवणार आहेच.
येत्या नजीकच्या काळात वरणगाव नगर पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे प्रत्येक पक्ष आपल्या नैसर्गिक वाढीसाठी प्रयत्नशील असणे हे लोकशाहीचे गमक आहे. त्यानुसार शिवसेनेसोबतच्या घटक पक्षांनी आपल्या महाविकास आघाडीची वाटचाल सत्ता काबीज करण्याच्या दिशेने करणे हे ही सनदशिरच आहे असे असताना महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही आपल्या निवडणुकीतील यशासाठी नेटाचे प्रयत्न सुरू केले असल्याचे पाहून विरोधकांचे धाबे दणाणले आहे म्हणून महाविकास आघाडीत बिघडी करण्यासाठी काहींनी बेंबीच्या देठापासून धडपड सुरू केली आहे शिवसेना हा पक्ष शिस्तीने वाटचाल करणारा पक्ष आहे संघटनेत वरिष्ठांच्या आदेशा शिवाय कोणतेही फेरबदल वा भूमिकेत बदल संभवतच नाही पक्षाचे वरीष्ठांनी महाविकास आघाडी सोबत राहूनच सर्व स्वायत्त संस्थांच्या निवडणुकात एकसंघ लढणे हे लोकशाही च्या बळकटीकरणा साठी आज घडीला आवश्यक आहे. म्हणून आम्ही महाविकास आघाडीसह वरणगाव नगर पंचायतीच्या निवडणुकीत उतरणार आहे. वरिष्ठांचे आदेश आणि शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख विलास पारकर, उत्तर महाराष्ट्र समन्वयक तथा उपनेते रवींद्र मिर्लेकर, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपनेते गुलाबरव पाटील, आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सूचना व निर्देश आहे असे परिपत्रक शिवसेनेचे भुसावळ तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *