भुसावळातील हुडको कॉलनीत चोरी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरात चोर्‍या-घरफोड्या कायम असून बंद घराला टार्गेट करीत चोरट्यांनी चोरी केल्याची घटना शुक्रवारी दुपारी हुडको कॉलनीत उघडकीस आली. बाळू देवराम चौधरी (61, रा. हुडको कॉलनी, गजानन महाराज मंदीराजवळ) हे कामानिमित्ताने 2 डिसेंबर रोजी नातेवाईंकांकडे गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधत घराचा कडी-कोयंडा तोडून आठ हजार 500 रुपयांची रोकड लांबवली तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त फेकला. शुक्रवारी चौधरी घरी आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास हवालदार जयराम खोडपे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *