भुसावळ (प्रतिनिधी )-

तालुक्यातील साकेगाव येथील ग्रामविकास अधिकारी यांनी करोना संक्रमण दरम्यान ग्रामपंचायत कराच्या रकमा वसूल करून ग्रामपंचायतचे खात्यात भरणा करणे आवश्यक असताना त्यांनी ही रक्कम वसूल करून परस्पर खर्च केली व आर्थिक अनियमितता केली असल्याचे निदर्शनास आल्यावरून आज ३ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गौतम वाडे यांना निलंबत केले.
निलंबन आदेशात १९ – २० व २० -२१ या आर्थिक वर्षात घरपट्टी व पाणीपट्टी वसूल केली आहे. वसूल करण्यात आलेली रक्कम ग्रामपंचायतीचे खात्यात भरणा न करता परस्पर खर्च केली तसेच या वर्षात किती ग्रा. पं.कर वसूल केला याचा कोठेही उल्लेख नसल्याने तसेच ही वसुल रक्कम कोण कोणत्या बाबींवर खर्च केली याबाबत कोणतेही पुरावे जोडलेले नाहीत. दोन वर्षातील वर्ष निहाय किती व कोणत्या कोणत्या बाबीवर खर्च केला त्याची मूल्यांकनात व मोजमाप पुस्तके इत्यादी सोबत जोडलेल्या नाहीत. तसेच सरपंच चषक २०१९ – २० या आर्थिक वर्षात १४ व्या वित्त आयोग निधी अंतर्गत सरपंच चषक या उपक्रमाचे आराखडयात तरतुद केलेले नसुन या कामाचे अंदाजपत्रक व मुल्याकन दप्तरी उपलब्ध नाही असे आदेशात नमुद करण्यात आले आहे. ग्रामसेवक यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करणे करता तसेच सात दिवसाच्या कार्यालयात सादर करावे याकामी विलंब झाल्यास प्रशासकीय अधिकारी म्हणून जबाबदार धरण्यात येऊन कारवाई प्रस्तावित केली जाईल असेही आदेशात नमूद केले आहे. ग्रामविकास अधिकारी गौतम वाडे हे कार्यरत असतांना करोना काळात त्यांनी ग्रामपंचायत कराच्या रकमा वसूल करून ग्रामपंचायतीचे खात्यात भरणा करणे आवश्यक असताना त्यांनी ही वसूल रक्कम परस्पर खर्च करून आर्थिक अनियमितता केली असल्याचे निदर्शनास आल्याने तरतुदीचे उल्लंंघन केल्याचे निदर्शनास आले त्यानुसार त्यांच्यावर आज ३ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबत केले.
· तसेच या आर्थिक अनिमिततेस सरपंच दोषी असल्याचे निदर्शनात येत असल्यास त्यांचे विरुद्ध कोणती कारवाई करण्यात यावी याबाबत अहवालात अभिप्राय नोंदविणेत यावा असेही नमूद करण्यात आले आहे.


