मेहुण्यांचा खून : शालकासह दोघा आरोपींना कोठडी –


भुसावळ –
बहिणीसह भाच्याच्या अपघाती मृत्यूला मेहुणाच जवाबदार असल्याचा राग डोक्यात ठेवून शालकाने एकाच्या मदतीने सख्ख्या मेहुण्याचे अपहरण करून त्याचा खून केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली होती. शहर पोलिसात अत्यंत बारकाईने या गुन्ह्याचा तपास करीत खुनाची घटना उघडकीस आणली होती. रमेश रामदास पवार व सुनील गायकवाड या आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना न्यायालयाने सोमवार, 30 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. सोमवारी पुन्हा आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आरोपींनी राजू शामराव मिरठकर यांना मारहाण करीत त्यांचा गळा आवळून खून केल्याची घटना नांदूरा जवळील जंगलात घडली होती. पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक संदीप दूलगवू हे तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *