सभापती निवासस्थानात चोरी तीन दिवस सुटीचा चोरट्यांनी घेतला फायदा : शहर पोलिसात तक्रार


भुसावळ (प्रतिनिधी) – येथील पंचायत समितीचे सभापती मनीषा पाटील यांच्या सभापती निवास्थानातून अज्ञात चोरट्यांनी मुद्देमाल लांबविल्याची घटना दि.१ डिसेंबर रोजी उघडकीस आली. याबाबत शहर पोलिसात तक्रार करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.२८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान शासकीय सुटी असल्यामुळे सभापती निवास तीन दिवस बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी निवासस्थानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केल. ही घटना दि.१ डिसेंबर रोजी सकाळी निवासस्थान उघडले असता लक्षात आली. याबाबत सभापती मनीषा पाटील यांनी सांगितले की चोरट्यांनी निवासस्थानातून गॅस सिलेंडर व इलेक्ट्रीक मोटरची चोरी केली. याबाबत सभापती पाटील यांनी याबाबत शहर पोलिसात तक्रार दिली आहे. शहर पोलिस ठाण्याच्या हाकीच्या अंतरावर असलेल्या या सभापती निवासात चोरी झाल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
शासकीय निवासस्थानांवर चोरट्यांनी यापूर्वीही हात साफ केल्याच्या घटना घडल्या आहे. यापूर्वी रेल्वे न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधिश यांच्या घरात दोन वेळेस चोरी झाली आहे. त्यावेळी देव्हार्‍यातील चांदीचे देव, रक्कमेसह लॅपटॉप लांबविला होता. त्यानंतर शहरातील एका पोलिस अधिकार्‍याच्या सरकारी निवासस्थानावरही चोरट्याने डल्ला मारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *