ब्राह्मण संघ भुसावळच्या कोजागरी पौर्णिमेनिमित्त दुग्धपान व सौ रजनी ताई सावकारे यांच्या हृद्द सत्कार संपन्न.


भुसावळ (प्रतिनिधी) - ब्राह्मण संघ भुसावळच्या कोजागरी पौर्णिमेनिमित्त दुग्धपान व सौ रजनी ताई सावकारे यांच्या हृद्द सत्कार संपन्न झाला. तसेच गायन व विविध कलांचा कार्यक्रम उत्सहात पार पडला.
कार्यक्रमात सौ. रजनीताईंनी लोकाग्रहास्तव या प्रसंगी एक गजल गायली.कार्यक्रमात सहभाग. ब्राह्मण संघ भुसावळच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही समाज एकत्रिकरणाच्या हेतूसह स्थनिक कलाकारांच्या सहकार्याने गायन तसेच विविध कलांचे सादरीकरण करून कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ रजनी ताई सावकारे, संघांचे अध्यक्ष गणेश वढवेकर, सचिव महेंद्र गोडबोले, आणि नगरसेविका सौ. सोनल महाजन व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्वप्रथम श्री महालक्ष्मी मातेच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्ज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. या वेळी जळगांव जिल्हा बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली म्हणून सौ रजनीताई सावकारे यांचा ब्राह्मण संघाच्या वतीने हृद सत्कार करण्यात आला. 
सचिव महेंद्र गोडबोले यांनी प्रास्ताविक केले. रजनीताई यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना ब्राह्मण समाजाने वेळोवेळी केलेल्या सहकार्याचा उल्लेख केला व समाजाच्या ऋणात राहण्याची इच्छा व्यक्त केली. अध्यक्ष गणेश वढवेकर यांनी समाज कार्याला अर्थकारण जोडण्याची संकल्पना मांडली. पंकज जोशी आणि अतुल जोशी यांनी सूत्र संचलन व आभार व्यक्त केले. तसेच स्थानिक कलाकारांच्या सहकार्याने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. दिनेश जोशी, प्रवीण कुलकर्णी, संदीप जोशी. डॉ राहुल पांडे, सौ दीपिका हिंगवे, श्री साखरे, श्री नरेंद्र गुरव (सावदा ) यांनी सुरेल गीत गायन करून तसेच स्वयंसिद्ध महिला मंडळ यांनी ग्रुप डान्स करून उपस्थित समाज बांधवांचे  मनं जिंकली. दुग्ध पान व सोबत स्वादिष्ट मुग भजे प्रज्ञा पेटारे यांनी बनवून स्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. संघांचे कोषाधक्ष आमोद टेम्भूर्णीकर, डॉ रमेश जोशी संजय बोचरे, तुषार कुलकर्णी, मनोज कुलकर्णी, दिनेश जोशी, जयंत जोशी, कल्पना दामले, सौ वैशाली एकलारकार, विवेक कुलकर्णी, शंतनू गचके  तसेच संघांचे माजी अध्यक्ष अॕड संजय जोशी आणि रघुनाथ मांडाळकर, माजी सचिव अनिल हिंगवे यांची खास उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वितेसाठी समस्त कार्यकारिणी व अशोक पाटील, प्रज्ञा पेटारे, किशोर ओगले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला 200 च्या वर समाज बांधव उपस्थित होते.