न्यू इंग्लिश स्कूल नशिराबाद येथे इंग्रजी स्पेलिंग स्पर्धेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश


   भुसावळ (प्रतिनिधी) - नशिराबाद, ता.जळगाव  येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिर, नशिराबाद येथे गणेश उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या इंग्रजी स्पेलिंग उत्साहात साजरी.. 

सर्वप्रथम नशिराबाद नगराध्यक्ष तथा संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील व संचालक ॲड प्रदीप देशपांडे यांच्या हस्ते श्री ची आरती करण्यात आली.

विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेची गोडी निर्माण व्हावी आणि शब्दसंपत्ती वाढावी व त्याचप्रमाणे बौद्धिक कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत इयत्ता ३ री ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी दोन विद्यार्थ्यांच्या गटानुसारमोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत अत्यंत चुरस पाहायला मिळाली. अंतिम फेरीत समान गुण मिळाल्याने प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला.

*स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे -*

*प्रथम क्रमांक (विभागून):* कु. मृणाल चौधरी, कु. डिंपल रोटे, कु. चित्राक्षी चौधरी आणि कु. चैताली पाटील

*द्वितीय क्रमांक (विभागून):* कु. देवेंद्र भोई आणि कु. रूद्र चौधरी

सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे कार्याध्यक्ष योगेश पाटील व ॲड प्रदिप देशपांडे, मुख्याध्यापक प्रविण महाजन व शिक्षकवृंदाकडून अभिनंदन करण्यात आले. विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते व आत्मविश्वास वाढतो, असे सांगण्यात आले.या स्पर्धेचे  नियोजन वंदना चौधरी आणि स्पर्धेचे सुत्रसंचालन नंदिनी सुर्यवंशी व परीक्षण पूजा पाटील यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.